आयसीसीला पुरावे देण्यास अल जझिराचा नकार

श्रीलंका पिच फिक्‍सिंग प्रकरण
नवी दिल्ली – खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या प्रकरणी अल जझिरा या वाहिनीने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली आहे. हॅरिसन यांनी केलेल्या ‘क्रिकेट्‌स मॅच फिक्‍सर्स’ या 54 मिनिटांच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगमध्ये तब्बल चार कसोटी सामने फिक्‍स झाल्याचं आढळून आले आहे. त्यापैकी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचा समावेश होता. या प्रकरणी आयसीसीने अल जझिरा वाहिनीकडे संपूर्ण फूटेजची मागणी केली असून संबंधित फूटेज देण्यास अल जझिरानेने नकार दिला आहे. त्यामुळेच या प्रकरणी पुढे काय होईल हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

वाहिनीच्या अधिकाऱ्यांसोबत आमचा संपर्क आहे. मात्र त्यांनी आम्हाला सहकार्य करण्यास नकार दिला असून ते संपूर्ण फूटेज देण्यास त्यांची तयारी नाही, अशी माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी मंडळाचे अध्यक्ष ऍलेक्‍स मार्शल यांनी अल जझिराने “क्रिकेट्‌स मॅच फिक्‍सर्स’ ही डॉक्‍युमेंट्री प्रक्षेपित केल्यानंतर दिली. आम्हाला त्यांनी प्रसारित केलेल्या डॉक्‍युमेंट्रीमधील सामग्रीचा उपयोग होईल. परंतु डॉक्‍युमेंट्री बनवताना काटछाट करतानाही अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता असू शकते. त्यामुळे त्यांनी तयार केलेल्या आणि संपादित न केलेल्या मूळ व्हिडीओची मागणी केली असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अल जझिराच्या वृत्तानुसार भारताच्या श्रीलंका (गॅले- 26 ते 29 जुलै 2017), ऑस्ट्रेलिया (रांची- 16 ते 20 मार्च 2017) आणि इंग्लंड (चेन्नई- 16 ते 20 डिसेंबर 2016) हे कसोटी सामने संशयाच्या भोवऱ्यात आहेत. यापैकी गॅले आणि चेन्नईची कसोटी भारताने जिंकली होती, तर रांची कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यात भारताच्या तीन कसोटी आहेत, तसेच मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याचाही सहभाग असल्याचा संशय आहे. मॉरिसने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

या बाबत बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले की, आयसीसीने चौकशी सुरू केली असून रॉबिन मॉरिसबाबत काय निर्णय घेतात, त्यानुसार आम्ही पुढची पावला टाकणार आहोत. मॉरिसचा भारतीय मंडळाच्या कोणत्याही योजनेत सहभाग नाही. दोषी ठरल्यास भारतीय मंडळ केवळ त्याचे पेन्शन रद्द करू शकेल. कतारमधील ‘अल जझिरा’ वाहिनीच्या डेव्हिड हॅरिसन या रिपोर्टरने आपण ब्रिटिश उद्योगपती असल्याचं भासवून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या विविध खेळाडू आणि अधिकाऱ्यांशी संधान बांधले होते.

डॉक्‍युमेंट्रीमध्ये कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूचा उल्लेख नसला, तरी स्टिंगमध्ये काही जणांचे फोटो दिसत आहेत. दाऊद गॅंगच्या अनिल मुनावरसह मुंबईचा माजी रणजीपटू रॉबिन मॉरिस, पाकिस्तानचा हसन रझा, श्रीलंकेच्या दिलहारा लोकुहेट्टिगे, जीवन्था कुलतुंगा आणि थरिन्दू मेंडिसचा यांचा फिक्‍सिंगमध्ये हात असल्याचं अल जझिराच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.

इंग्लंडने फेटाळला दावा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी प्रमुख जेम्स सदरलॅंड यांनी या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. आम्ही हे आरोप गांभीर्याने धेतले असून आम्हाला िुचत्रफितीची मूळ प्रत किंवा कोणताही पुरावा पाहण्याची संधी देण्यात आलेली नसल्याने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही. परंतु आम्ही कोणत्याही विश्‍वासार्ह पुराव्याची वाट पाहात आहोत.

इंग्लंड क्रिकेट मंडळाचे कार्यकारी प्रमुख टॉम हॅरिसन यांनी मात्र फिक्‍सिंगबाबतचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या खेळाडूंवर अविश्‍वास दाखविता येईल, असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)