‘आयपीओ’मधून होणारी कमाई

2017 आणि 2018या आर्थिक वर्षांत आयपीओमधून गुंतवणूकदारांची मोठी कमाई झाली आहे. अर्थात, सर्वच आयपीओमधून कमाई होऊ शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. पण कोणत्या क्षेत्रात विक्री वाढणार आहे, याचा अंदाज आल्यास तसे आयपीओ निवडून आपण फायदा मिळवू शकतो.

गेल्या वर्षभरात बाजारात चढउतार चालूच होते, मात्र मधला काही काळ आयपीओसाठी फार चांगला ठरल्याने काही कंपनीच्या आयपीओनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या वर्षांत एकूण 45 आयपीओ आले. त्या माध्यमातून कंपन्यानी तब्बल 82 हजार 109 कोटी रुपये उभे केले. आयपीओतून वर्षभरात मालामाल करणाऱ्या कंपन्यांपैकी पहिले नाव आहे ते शंकरा बिल्डींग प्रोडकट. या कंपनीच्या आयपीओचे पाच एप्रिल 2017 रोजी लिस्टिंग झाले. आयपीओला अर्ज करताना या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती 480 आणि त्याची लिस्टिंग झाली 555 रुपयांना. म्हणजे लिस्टिंग होताच गुंतवणूकदारांना 21टक्के परतावा मिळाला. आणि या एका घटनेने कंपनीचे बाजारमूल्य झाले 1245 कोटी. बंगळूरला असलेली ही बांधकाम क्षेत्रातील छोटी कंपनी.

बांधकाम साहित्य पुरविणारी, पण तिला मागणी वाढली, याचे कारण जीएसटी. या करपद्धतीचा फायदा संघटीत क्षेत्राला होणार असून बांधकाम साहित्य पुरविणारे जे असंघटीत आहे, त्यांच्याकडील व्यवसाय अशा संघटीत कंपन्यांना मिळणार आहे. गुंतवणूकदारांनी हे ओळखले आणि आयपीओला अर्ज केला. अर्थात, या कंपनीचा व्यवसाय आणि आर्थिक स्थिती आणि कारभार पारदर्शी असल्यामुळेच गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास टाकला, हे ओघाने आलेच. गेल्या आठवड्यात या कंपनीचा भाव होता 1878 रुपये ! आणि कंपनीचे बाजारमूल्य एका वर्षांत झाले आहे 4350 कोटी रुपये. म्हणजे गुंतवणूकदारांना200 टक्के परतावा मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बांधकामक्षेत्र अडचणीत आहे, असे म्हटले जाते, पण खरीगोष्ट अशी आहे की ज्या मोठ्या कंपन्या आहे, त्यांची वेगाने वाढ होत आहे. रेरा आणि जीएसटीचा फायदा त्यांना अधिक होतो आहे. त्यामुळे शंकरा’ सारख्या कंपन्या यापुढील काळातही परतावा देतील, असे अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहे. अर्थात, आता हा शेअर महाग झाला असल्याने विचार करूनच त्याची खरेदी केली पाहिजे.

गेल्या वर्षांतील असाच एक आयपीओ म्हणजे एचडीएफसी स्टॅनडर्ड लाईफ इन्शुरन्स. तिचा आयपीओ होता 290 रुपयांना. तिचे लिस्टिंग वर्षअखेर झाले होते. आज तिच्या एका शेअरचा भाव आता आहे 482रुपये. म्हणजे70 टक्के परतावा केवळ पाच महिन्यात. अशा चांगल्या कंपन्यांचे आयपीओ घेतले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)