आयपीएल इतिहासात पृथ्वी शॉने केला ‘हा’ विक्रम

नवी दिल्ली : कर्णधार श्रेयस अय्यरने तीन चौकार आणि दहा षटकारांच्या साथीने नाबाद 93 धावांची खेळी उभारुन, दिल्ली डेअरडेव्हिल्सलापुन्हा सामन्यात परतवले. श्रेयसच्या याच खेळीच्या जोरावर दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा तब्बल 55 धावांनी धुव्वा उडवला. याच सामन्यात युवा फलंदाज पृथ्वी शॉनेही महत्त्वाची भूमिका निभावली. ज्याचे मोठे कौतुक केले जात आहे.

सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने 44 चेंडूत 62 धावांची खेळी केली, ज्यामध्ये दोन षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता.या अर्धशतकासोबतच आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही पृथ्वी शॉच्या नावावर जमा झाला. त्याने संजू सॅमसनच्या विक्रमाची बरोबरी साधली.

पृथ्वी शॉचं वय सध्या 18 वर्षे 169 दिवस आहे. एवढ्याच वयात यापूर्वी संजू सॅमसनने अर्धशतक ठोकले होते. संजू सॅमसनने हा विक्रम 2013 साली केला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी संजू सॅमसनच्या विक्रमाची बरोबरी साधली. भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने आतापर्यंत केवळ दोनच सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले आहे. पहिल्या सामन्यात शानदार सुरुवात करत त्याने 22 धावा केल्या होत्या, तर कालच्या सामन्यात 62 धावांची खेळी उभारली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)