आयकर विवरण भरण्याची आज शेवटची तारीख 

नवी दिल्ली: केद्र सरकारने आय कर संकलन वाढावे याकरीता विवरण सादर करण्याची मुदत वाढऊन दिली होती. आयकर विवरण भरण्याची वाढवलेली अंतिम तारीख आज 31 ऑगस्ट आहे. मात्र, एक महिन्याची मुदत वाढवून सुद्धा करदात्यानी आयकर भरला नसेल तर काही पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये आयकर भरण्यास उशिर झाला किंवा भरलाच नाही तर कोणताही दंड आकारला जात नव्हता.
मात्र, या वर्षी 2018-19 आयकर कायद्यामध्ये कलम वाढविण्यात आले आहे. यानुसार 31 ऑगस्टनंतर कर भरल्यास जास्तीतजास्त 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकणार आहे. यामध्येही काही स्तर आहेत. जर 31 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत आयकर भरल्यास 5000 रुपये, 1 जानेवारीनंतर कर भरल्यास 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकणार आहे. तर 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास हाच दंड 1000 रुपयांपर्यंत आकारला जाणार आहे. नोकरी न करणाऱ्या करदात्याने जर उशिराने कर भरला असेल तर त्याला कराच्या रकमेच्या व्याजासह कर भरावा लागणार आहे. तसेच तपासल्यानंतर जर आयकर विभागाने अतिरिक्त कर मागितल्यास त्या रकमेवरही व्याज द्यावे लागणार आहे. यामुळे आयकर वेळेवर भरणे फायद्याचे ठरू शकते.
आयकर रिटर्न मुदतीत भरण्याची आणि उशिराने भरण्याची प्रक्रिया सारखीच आहे. फरक एवढाच आहे, जेव्हा उशिराने आयकर भरला जातो तेव्हा रिटर्न फाईल अंडर 139(4) निवडावे लागते. उशिराने आयकर भरल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्याची मुभा नसते. आयकर परतावा भरला की निम्मे काम होते. आयकर परतावा भरल्यानंतर 120 दिवसांत त्याची पडताळणीही करायची असते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)