आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात राहणा-या एका आयकर अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

बबलू कुमार प्रसाद (वय-32, आकुर्डी) असे आत्महत्या केलेल्या आयकर अधिका-याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बबलू कुमार हे आईसह आकुर्डी परिसरात वास्तव्यास होते. साधारण दोन वर्षापूर्वी त्यांचा एक पाय शरीरापासून वेगळा करण्यात आला होता. तेव्हापासून ते तणावात होते. दरम्यान, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला असावा. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांना बबलू कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे. चिठ्ठीत त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)