आयकरदात्यांना खूषखबर ! पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

नवी दिल्ली: केंद्र सरकारने त्यांच्या यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना अपेक्षेप्रमाणे मोठा दिलासा दिला आहे. आता पाच लाख रूपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे. तसेच आयकरासाठीची प्रमाणीत वजावटीची मर्यादाही 40 हजार रूपयांवरून 50 रूपये करण्यात आली आहे. त्यामुळे पगारदार मध्यमवर्गीयांना याचा मोठा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 18 हजार 500 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे.

काही विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवलेल्या निधीवरील आयकर सवलत हिशोबात पकडली तर सुमारे साडे सहा लाख रूपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न आता करमुक्त असणार आहे असे पियुष गोयल यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की मेडिकल इन्श्‍युरन्स, होमलोन, एनपीएस अशा योजनांतून मिळणारा आयकर लाभ जमेला धरला तर सवलतीची ही मर्यादा आणखी वाढते असेही गोयल यांनी यावेळी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयकरदात्यांना मोठी करसवलत देण्यात यावी अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती. व निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकार अशी सवलत जाहीर करेल अशी अपेक्षाही होती. पण ही सवलत मर्यादा नेमकी किती असेल या विषयी औत्सुक्‍य होते. सरकारने पाच लाख रूपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करून नोकरदार मध्यमवर्गाला खूष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या सवलतीचा सुमारे तीन कोटी मध्यमवर्गीय कुटुंबांना लाभ होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)