आयएल ऍण्ड एफएस कोसळणार नाही 

एलआयसी : कंपनीच्या पुनरुज्जीवनाच्या सर्व शक्‍यता अद्याप खुल्या 
केंद्र सरकार मात्र या विषयावर तटस्थ राहणार-गर्ग 
नवी दिल्ली: आयएल ऍण्ड एफएस या कंपनीत सर्वांत जास्त गुंतवणूक असणाऱ्या एलआयसीने या कंपनीला कोसळू दिले जाणार नाही. सर्व शक्‍यता खुल्या आहेत, असे सांगितले आहे. मात्र, सरकारने आयएल ऍण्ड एफएस ही स्वतंत्र कंपनी असून ती आपले प्रश्‍न सोडवील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.
आज या अनुषंगाने एलआयसीचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा यांनी अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आयएल ऍण्ड एफएस कंपनीवर बरेच कर्ज आहे. तिने तीन देणी दिलेली नाहीत. मात्र, आम्ही ही कंपनी कोसळू देणार नाही. परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यावर विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नंतर आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले की, आयएल ऍण्ड एफएस ही कंपनी स्वतंत्र आहे. त्या कंपनीने काही प्रश्‍न निर्माण झाले असतील ते लवकर सोडविण्याची गरज आहे. सरकारचा या कंपनीत काही हिस्सा नाही. मात्र, सरकारचा ज्या कंपन्यांत हिस्सा आहे, त्या एलआयसी आणि स्टेट बॅंकांचा आयएल ऍण्ड एफएसमध्ये हिस्सा आहे.
आयएल ऍण्ड एफएस पायाभूत सुविधासाठी भांडवलाचा पुरवठा करणारी बिगर बॅंकिंग वित्त संस्था आहे. या कंपनीवर सध्या 91 हजार कोटी रुपयाचे कर्ज आहे. त्यातील 57 हजार कोटी सरकारी बॅंकेचे आहेत. त्यामुळे या कंपनीत पेच निर्माण झाल्यापासून सरकारी बॅंकाचे शेअर कोसळत आहेत. त्याचबरोबर एनबीएफसी कंपन्यांचे शेअरही कोसळत असल्याचे वातावरण शेअरबाजारात आहे.
कंपनीने कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनीला सवलतीच्या स्वरूपात 16 हजार कोटी रुपयांचे येणे होते. ते काही नियमांच्या जंजाळात अडकले आहे. ते योग्य वेळी आले असते तर हा पेच निर्माण झाला नसता. मात्र, तरीही कंपनी आता सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, भारत सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच हा प्रश्‍न निर्माण झाला असल्यामुळे या क्षेत्राला चांगलाच धक्‍का बसला असल्याचे वातावरण निर्माण
झाले आहे.
आयएल ऍण्ड एफएस या बिगर बॅंकिंग वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीच्या अनुषंगाने काही नकारात्मक घडामोडी घडलेल्या आहेत. मात्र, दीर्घ पल्ल्यात या कंपनीचे काम उपयोगी आणि महत्त्वाचे आहे. त्यामुळे एलआयसीसह या कंपनीत गुंतवणूक असणाऱ्या इतर बॅंका ही कंपनी कोसळणार नाही, याची काळजी घेतील. त्यासाठी पुरेसे स्त्रोत आमच्याकडे आहेत. 
-व्ही. के. शर्मा अध्यक्ष, एलआयसी 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)