आयएलएफएस कंपनीचे भांडवल उभारणीसाठी प्रयत्न 

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने काल रात्री आयएल ऍण्ड एफएसच्या गुंतवणूकदारांना या कंपनीचे भांडवलविषयक प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले होते. त्यानंतर आज या कंपनीच्या भागधारकांची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे भांडवलविषयक प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.
या अनुषंगाने कंपनीच्या भांडवल उभारणीसाठीच्या प्रयत्नांना रोखे खरेदीद्वारा प्रतिसाद देण्याचा निर्णय एलआयसी आणि ओरिक्‍स या कंपन्यांनी घेतला आहे. या रोखे विक्रीच्या माध्यमातून कंपनी पुढच्या महिन्यात किमान 4 हजार कोटी रुपये उभे करणार आहे. या रकमेचा उपयोग थकलेल्या कर्जाचे हप्ते देण्यासाठी केला जाणार आहे. या कंपनीवर तब्बल 91 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज सरकारी बॅंकांनी दिले आहे. त्यामुळे बाजारात भांडवल टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता असल्यामुळे बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तसंस्थाच्या शेअरच्या भावात गेल्या एक महिन्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. भांडवल सुलभता वाढावी याकरिता रिझर्व्ह बॅंकेने अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारनेही हा प्रश्‍न शक्‍य तितक्‍या लवकर सोडविण्यास सर्वांना बजावले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)