आम्ही वचनपूर्तीच नव्हे तर कर्तव्यपूर्तीही केली

  • संग्राम थोपटे ः 62 कोटींची विकासकामे करून आदर्श निर्माण केला

भोर – भोर शहरात या पाच वर्षात आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून सुमारे 62 कोटींची विकासकामे करून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. आम्ही वचनपूर्तीच नव्हे तर कर्तव्यपूर्तीही केली असून एकेकाळी राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले असलेले आणि आजचे शिवसेनेचे तालुका युवक प्रमुख भोर नगरपालिकेवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. असे भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष तानाजी तारू आणि उप नगराध्यक्ष देविदास गायकवाड यांनी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
भोर शहर शिवसेना प्रमुख भालचंद्र मळेकर यांनी वचनपूर्ती मेळाव्यात कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भोर शहरातील शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. नगराध्यऽ व उपनगराध्यक्ष यांनी केदार देशपांडे हे काही काळ राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, तेव्हा त्यांनी पद्मावती नगरसाठी पाण्याची लाइन का टाकली नाही, असा सवाल करुन आम्ही केलेल्या कामाचे श्रेय ते कसे काय घेऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित केला. भोर शहरात बालोद्यान आणि नाना-नानी पार्क आम्ही सुरू केले आहे. कुठलेही विकासकाम करायचे नाही आणि राजकीय हव्यासापोटी बेताल वक्तव्य करायची, हा शिवसेनेच्या केदार देशपांडे यांचा स्वभाव असल्याची टीकाही या वेळी करण्यात आली. भोर शहर सोलर सिटी करण्याचे आम्ही दिलेले वचन येत्या काही महिन्यात पुर्ण करी असे अश्वासनही देण्यात आले. भोर नगरपालिकेवर पुन्हा कॉंग्रेस पक्षच सत्तेवर येईल, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका ऍड. जयश्री शिंदे, नगरसेविका विजयालक्ष्मी पाठक, नगरसेवक संजय जगताप, बंडुशेठ गुजराथी, गजानन दानवले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)