आम्ही युतीस तयार; शिवसेनेने निर्णय घ्यावा!

भाजपाकडून पुनरूच्चार
मुंबई – आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणूका स्वबळावर लढवणार या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतरही भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेनेसोबत युतीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला रोखण्यासाठी येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती व्हावी, अशी भाजपाची इच्छा आहे.

दोन्ही पक्षांची 25 वर्षांपासूनची युती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही युती करण्यासाठी प्रयत्न करू. मात्र आता युतीचा निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे, अशी स्पष्ट भूमिका भाजपाचे नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केली.
भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणीच्या दोन दिवसीय बैठकीला मुंबईत सुरुवात झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यकारीणी बैठकीच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेला संबोधित करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. तसेच आम्ही शिवसेनेसोबत युतीसाठी तयार असून आता शिवसेनेनेच निर्णय घ्यावा, असे सांगत युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला.

दोघांचीही विचारधारा समान आहे. मंत्रीमंडळात देखील दोन्ही पक्षात मतैक्‍य असते. यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत युती व्हावी अशी भाजपामधील सर्वांचीच इच्छा आहे. प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत देखील हाच विचार व्यक्त करण्यात आला आल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाने लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी नेमला आहे. गुरूवारच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला प्रारंभी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी संबोधित करतील तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे. राजकीय, कृषि तसेच अन्य ठरावही मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेसमोर आकडेवारीच मांडणार
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेसाठी आसुसलेले आहेत. त्यासाठी ते सरकारवर वाटेल तसे आरोप करत आहेत. आम्ही आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खरा चेहरा उघड करणार आहोत. आघाडी सरकारची पंधरा वर्षे आणि आमची चार वर्षे अशी पुस्तिकाच छापणार आहोत. आमच्या सरकारने चार वर्षांत लोकहिताचे जे निर्णय घेतले त्यांची माहिती देणार आहोत.

कृषि तसेच अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी कोणत्या सरकारने किती निधी दिला याची आकडेवारीच जनतेसमोर मांडणार आहोत. कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात कोणी किती तरतूद केली हे देखील जनतेला सांगणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)