आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव

  • शाब्बास या उपक्रमांतर्गत तालुक्‍यात उपक्रम

पिरंगुट – पुण्यातील मुळशीकरांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्यावतीने शाब्बास या उपक्रमांतर्गत तालुक्‍यातील इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला. पौडला पंचायत समितीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांना करीअरचा तसेच जीवन जगण्याच्या तंत्राचाही कानमंत्र मिळाला.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 12 वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. तर गेली दोन वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तालुक्‍यातच स्वतंत्र गौरव केला जातो. या कार्यक्रमास युनिक ऍकॅडमीचे प्रमुख नागेश गव्हाणे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऍड.गणेश सातपुते, पिरंगुटच्या विद्या भवन स्कूलच्या मुख्याध्यापिका सुचेत्रा साठे आदी उपस्थित होते. राम गायकवाड, माऊली डफळ, हनुमंत सुर्वे, दत्तात्रेय तारू, धनंजय टेमघरे, आत्माराम ववले, विलास अमराळे, योगेश बामगुडे, रमेश उभे यांनी याचे नियोजन केले होते.
यावेळी गव्हाणे म्हणाले, या स्पर्धा परीक्षेसाठी कोणत्याही टक्केवारीची अपेक्षा नाही. कौशल्यप्राप्त युवकांची मागणी आहे. कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा आहे. शिक्षण हे आपले अस्तित्व आहे. ज्या वर्गात आहात तिथे प्रामाणिक अभ्यास करा. तीच आपल्या भविष्याची नांदी आहे.
यावेळी सातपुते म्हणाले, प्रतिष्ठानच्यावतीने पौड येथील कार्यालयात स्पर्धा परीक्षेसाठी आवश्‍यक असणारी हजारो पुस्तके उपलब्ध आहे. येथे वाचनासाठी कार्यालय आहे, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. विद्यार्थ्यांना करीअर करीत असतानाही कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान तुमच्या सहकार्यासाठी सज्ज आहे.
प्रास्ताविक राम गायकवाड तर स्वागत हनुमंत सुर्वे यांनी केले. सूत्रसंचालन बंडू दातीर, आभार माऊली डफळ यांनी मानले.

  • यांचा केला सन्मान
    यावेळी सहा इंची खिळ्यावर झोपून छातीवर एक हजार किलोच्या फरश्‍या फोडण्याचा नवा जागतिक विक्रम रचणारी चांद्याची कराटेपटू वैष्णवी मांडेकर, नॅशनल स्कॉलर सर्च एक्‍झाममध्ये राज्यात प्रथम आलेला विराज आणि दुसरा आलेला त्याचा भाऊ स्वराज संतोष गावडे, किक बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदक मिळविलेली सिद्धी सुर्वे, यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक शाळेत दहावी, बारावीत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंतांना गौरविण्यात आले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)