आमिर खानच्या “महाभारत’मध्ये प्रभासची एंट्री

आमिर खानने त्याच्या महत्त्वाकांक्षी “महाभारत’ प्रोजेक्‍टची घोषणा केली तेव्हापासूनच त्याच्या या सिनेमाबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली होती. हळूहळू त्याची या सिनेमासाठी कलाकारांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. एकाच सिनेमामध्ये महाभारताच्या पूर्ण कथेचा आवाका येणार नाही, हे लक्षात आल्यावर आमिरने तीन स्वतंत्र सिनेमांद्वारे महाभारत करायचे ठरवले आहे. आता मिळालेल्या ताज्या बातमीनुसार त्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्‍टमध्ये प्रभासची निवड निश्‍चित झाली आहे. “बाहुबली’मधील प्रभासचा अभिनय आणि अॅक्‍शन स्कील बघून आमिर खूप प्रभावित झाला आहे. महाभारतात प्रभासला कोणता रोल द्यायचा, हे अद्याप निश्‍चित झाले नसावे. मात्र, कदाचित प्रभासला अर्जुनाचा रोल दिला जाण्याची शक्‍यताच जास्त आहे. प्रभासला या प्रोजेक्‍टमध्ये घ्यायचे असे मात्र आमिरने ठरवले आहे. त्यासाठी प्रभासला विचारणाही झाल्याचे समजते आहे.

या अतिशय महत्त्वाच्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आमिरने एस. एस. राजामौली यांच्यावर सोपवायची असे ठरवले आहे. बिग बजेट सिनेमांची हाताळणी राजामौली खूप चांगल्या प्रकारे करू शकतात, असा अनुभव आहे. स्वतः राजामौलीही “महाभारत’ करण्याचा विचार बऱ्याच काळापासून करत होते. स्वतः आमिरला या महाभारतात कर्ण किंवा श्रीकृष्णाचा रोल करण्याची इच्छा आहे. त्याची कष्ट घेण्याची तयारी पाहता तो स्वतः कृष्णाचा रोल घेईल हीच शक्‍यता जास्त आहे. तसे झाले तर त्याला तिन्ही भागांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सिनेमाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणजे द्रौपदीच्या रोलसाठी दीपिका पदुकोणची निवड जवळपास निश्‍चित झाली आहे. “पद्‌मावत’मध्ये दीपिकाने केलेला अभिनय पाहता पिरीएड फिल्मसाठी तिची निवड अगदी योग्य असेल. सुमारे हजार कोटी रुपये खर्चाच्या या बिगबजेटची जबाबदारी रिलायन्स एन्टरटेनमेंटने उचलली असल्याचे समजते आहे. आमिरच्या हातातील सध्याच्या सिनेमांचे शुटिंग पूर्ण झाले की तो या “महाभारत’च्या निर्मितीच्या कामाला सुरुवात करण्याची शक्‍यता आहे. साधारण वर्षभराच्या आत संपूर्ण जुळवाजुळव पूर्ण होईल आणि “महाभारत’ची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)