आमदार रवी राणांविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल

अमरावती – बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा यांनी सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप अडसूळ यांनी केला आहे.

रवी राणा यांनी सोशल मीडियावर आरोप करुन बदनामी केली. मात्र रवी राणा यांनी याबाबतची कोणतीही तक्रार पोलीस स्टेशन किंवा संबंधित विभागाकडे केली नाही. आपण अनुसूचित जाती, जमातीचे सदस्य आहेत. त्यामुळे रवी राणा यांनी जाणीवपूर्वक आपली बदनामी केली, असा दावा खासदार अडसूळ यांनी केला आणि रवी राणांविरोधात अट्रोसिटीची तक्रार दाखल केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई येथील सिटी बॅंकमध्ये 900 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करत रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर खोटे मेसेज प्रसारित केल्याचा आरोप खासदार अडसूळ यांनी केला. त्यामुळे रवी राणांविरोधात आपण 800 कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचेही अडसूळ यांनी सांगितले.

दरम्यान, सहाय्यक सुनील भालेराव यांनी पदाचा गैरवापर करत सीटी बॅंकेत 900 कोटींचा घोटाळा केला आणि बेहिशेबी संपत्ती जमवली, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. इतकंच नाही तर खासदार अडसूळ यांनी गोरगरीब जनता, पेन्शनधारकांचे पैसे लाटल्याची पोस्ट रवी राणा यांनी सोशल मीडियावर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)