‘आमदार देसाई,आधी स्वत:चे कर्तृत्व दाखवा…’

सत्यजितसिंह पाटणकर

सत्यजितसिंह पाटणकरांचे जोरदार प्रत्युत्तर
नवारस्ता – मला बालिश म्हटलं म्हणजे तुम्ही स्वत: परिपक्व झालात असे होत नाही, ज्यांना प्रगल्भ व प्रगल्ब यातला अर्थ कळत नाही, त्यांनी परिपक्वतेच्या गप्पा मारू नयेत. शिवसेनेचा आमदार होऊन मंत्रीपदासाठी भाजप, मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणे यावरून तुमची परिपक्वता दिसते. सेनेचा आमदार असून सेनेच्याच जिल्हाध्यक्षाला निवडणुकीत पाडणे यावरून तुमची पक्षनिष्ठाही सिद्ध होते, असे खणखणीत प्रतिऊत्तर युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आमदार शंभूराज देसाई यांना पत्रकाद्वारे दिले आहे.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल सभेत केलेले आरोप व प्रश्नावर तोंड उघडा असे मी संसदपट्टू आ. देसाई यांना जाहीर आव्हान दिले होते. मात्र त्याचे उत्तर ते देवूच शकत नाहीत, एवढी त्यांची महान कर्तबगारी आहे. अजितदादा मित्र, देवेंद्र फडणवीस दोस्त, अहो तुमची ही मैत्री त्यांनी स्विकारलीही असती मात्र त्यासाठी कर्तृत्व व पक्षनिष्ठाही असावी लागते.

यापूर्वी विधिमंडळाच्या आवारात तुम्ही धूर काढला व त्यानंतर तुम्हाला समज द्यायची वेळ आली ही तुमची परिपक्वता, गतवर्षी तुमच्या कर्तृत्वाने शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटनाला 500 रूपये दर कमी मिळाला. त्यामुळे 8 कोटी 60 लाख रूपयांचे नुकसान झाले ते कसे भरून देणार? याचे उत्तर आ. देसाई यांनी द्यावे, असा प्रतिहल्ला युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)