आमदारांनी मोदी-शहांसाठी काही जागा सोडाव्यात!

पिंपरी – एक वर्ष आधीपासूनच निवडणुकीचे पडघम जोरात घुमू लागले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात आमदार विरुद्ध खासदार असा कलगीतुरा रंगू लागला आहे. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोन्ही लोकसभा मतदार संघांवर भाजपची दावेदारी ठोकली होती. त्याचे उत्तर देताना शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार जगताप आणि लांडगे यांची चांगलीच फिरकी घेतली. ते म्हणाले महाराष्ट्रातील सर्व लोकसभा जागांचे वाटप हे दोघेच करणार आहेत का? त्यांना सांगा काही जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी सोडा, त्यांना ही काही वाटप करु द्या.

वेस्ट टू एनजीं प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पत्रकारांशी बोलताना मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भाजपच्या दोन्ही आमदारांचे नाव घेता त्यांना फैलावर घेतले.

खासदार बारणे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी दोघांवरही निशाना साधला. बारणे म्हणाले 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप, मनसे असा कित्येक पक्षांचा गोतावळा करुनही जगताप तब्बल एक लाख 57 हजार मतांनी हारले. राष्ट्रवादीने जगतापांना छुपे समर्थन दिले होते, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचे तर डिपॉजिट जप्त झाले. पुढील निवडणुकीत कुणी जरी समोर आले तरी काही फरक पडणार नाही. यावेळी बारणे यांनी आपण केलेले काम सांगताना दोन्ही आमदारांना चिमटे ही घेतले की, सेनेच्या दोन्ही खासदारांनी केवळ लोकांची कामेच केली, आपल्यावर कोणताही भ्रष्टाचाराच आरोप झाला नाही आणि आपण कोणत्याही लोकांना त्रास दिला नाही.

युती झाली तर स्वागत, नाही झाली तर आनंद
खासदार आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेना-भाजपमध्ये युती करणे किंवा न करणे हे पक्षश्रेष्ठींच्या हाती आहे. युती झाली तर स्वागत आहे आणि नाही झाली तर आनंद आहे. आपल्यासमोर निवडणुकीत कुणी जरी आले, तरी काहीही फरक पडणार नाही. मागील निवडणुकीतच आपण सांगितले होते की, बराक ओबामा जरी शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी आले तरी काहीही फरक पडणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)