आमदारांचे खड्डे बुजवणे हा राजकीय स्टंट : मनोज शेंडे

संचालकांच्या नियमबाह्य कर्जाचा खुलासा करावा
सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) – टिपर चालवून काही होत नाही हे त्यांचे म्हणणे असेल तर फक्त ठेवीदारांचे पैसे परत दिले म्हणजे भागलं का ? सभासदांच्या सभासद निधीचे काय ? बॅकेमार्फत नियमबाह्य कर्ज दिलेल्या संचालकांवरील कारवाईचे काय? याचा खुलासा आमदार महोदय उभ्या आयुष्यात करणार का ? असा सवाल सातारा नगरपरिषदेचे सार्वजनिक बांधकाम सभापती मनोज शेंडे यांनी केला आहे.

सातारा-जावलीच्या आमदारांच्या हातात, सातारा नगरपरिषदेची शाहुपूरी ग्रामपंचयातीचीही सत्ता नाही. त्यामुळे त्यांची बैचैनी दिवसेंदिवस वाढत आहे. खा. उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता त्यांना सातत्याने खुपत आहे. म्हणूनच भुविकास बॅंक ते जुना आरटीओ या रस्त्यावर त्यांच्या मार्फत खाजगी मुरूम टाकून खड्डे मुजवण्याचा चालवलेला प्रयत्न म्हणजे एक राजकीय स्टंट आहे. त्यांची कृती म्हणजे नागरिकांविषयी दाखवलेले बेगडी प्रेम आहे, अशी टीकाही त्यांनी प्रसिध्दीपत्रकात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा नगरपरिषद, रस्त्यावरील खड्ड्यांविषयी जागरुक आहे.पोवईनाक्‍यावरील ग्रेडसेपरेटरमुळे वाहतुकीची, प्रामुख्याने एसटीसारख्या मोठ्या व जड वाहनांची वर्दळ जुने आरटीओ ऑफिस ते भुविकास बॅंक या रस्त्यावर वाढली आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीचा ताण आला आहे. त्यातच संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाचा गेला. या रस्त्यावर नगरपरिषदेतमार्फत मुरुमाचे पॅचिंग केले गेले होते, परंतु वाहतुकीचा ताण व पडणारा पाऊस यामुळे या रस्त्यावर पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत. नगरपरिषदेने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नियमानुसार 15 आक्‍टोबर पर्यंत डांबरीकरण करता येणार नसल्याने, त्यानंतर लगेचच डांबरीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.तसेच सातारा शहरातील सर्व रस्त्यांवर मुरम पॅचिंग गेल्या महिन्या दिडमहिन्यापासून सातत्याने सुरु आहे. गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवाच्या पार्श्वभुमीवरही रस्त्यांचे पॅचिंग केले जात आहे. नगरपरिषदेने कोणतीही पॅचिंगच्या संदर्भात दिरंगाई केलेली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)