लखनौ – आम आदमी पक्षाने अखेर उत्तरप्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही या राज्यातील सर्व 403 जागा लढवणार आहोत, असे या पक्षाचे उत्तरप्रदेशचे निरीक्षक संजयसिंह यांनी म्हटले आहे.
या राज्यात झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये आम्हाला कॉंग्रेस पेक्षाही अधिक चांगले यश मिळाले आहे,÷असा दावाही त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, अलीकडेच झालेल्या पंचायत निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला केवळ 40 जागा मिळाल्या असून आम्हाला त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे 83 जागा मिळाल्या आहेत.
आम्ही तेथे 1600 जागा लढवल्या होत्या आणि आम्हाला 40 लाख मते मिळाली आहेत. आम्हाला येथे चांगला बेस आहे, असा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, उत्तरप्रदेशात कोणाबरोबरही आघाडी करण्याचा विचार सध्या आमच्यापुढे नाही. त्या संबंधात आमची कुणाशीही चर्चा सुरू नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.