‘आपत्ती व्यवस्थापनात’ शिवसेनेला स्थान नाही !

मुंबई – मराठा आरक्षणचा तिढा सोडवण्यासाठी एकीकडे विरोधकांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे या संवेदनशील विषयातही भाजप-शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे चव्हाट्यावर आले.

गुरुवारी रात्री झालेल्या वरिष्ठ मंत्र्यांचा बैठकीसाठी शिवसेनेच्या मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाल्यानंतर चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, बबनराव लोणीकर हे मंत्री, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आ. प्रवीण दरेकर हे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना भेटायला गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंत्री समितीचे सदस्य असूनही एकनाथ शिंदे व दिवाकर रावते यांचा शिष्टमंडळात समावेश नव्हता. शिवसेनेने याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)