आपण सावधान असतो, तोपर्यंत धोका नसतो – मंजुलज्योतिजी म.सा.

भोसरी- आराधना करताना धर्मावरील श्रद्धा अखंड ठेवा. ती कमी होऊ देऊ नका. जोपर्यंत आपण सावधान असतो, तोपर्यंत आपणास धोका नसतो. थोडीशीही निष्काळजी संकट उभे करते. आपल्या हृदयापर्यंत दुःखाची वेदना पोहचत नाही, तोपर्यंत आपल्या डोळ्यात अश्रू येत नाही. आपली जीभ जेवताना, बोलताना चावली गेली तरीही आपणास वेदना होतात. परंतु राग येत नाही, असे प्रतिपादन साध्वी उप प्रवर्तनी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी चातु:मास प्रवचनात केले.
भोसरी येथील श्री जैन संघाने चातु:मास महोत्सवात दैनंदिन प्रवचनाचे आयोजन केले आहे. साध्वी उप प्रवर्तनी मंजुलज्योतिजी म.सा. म्हणाल्या की, चालताना आपल्याच पायाचे नख दुसऱ्या पायाला लागले तरी दुःख होते; पण क्रोध येत नाही. असाच प्रकार दुसऱ्या व्यक्‍तीकडून घडल्यास प्रचंड राग येतो. याचाच अर्थ की जे कार्य, कर्म आपल्या हातून अजानपणे होते, त्याचा परिणाम सारखा असला, तरी राग दुसऱ्यांवरच येतो, स्वतःचा येत नाही. मनाची कर्मगती पाहता, आपल्या मनात एखादी गोष्ट एकाच मिनिटात येते. काही वेळात ती नष्ट होते. अशा गोष्टींचे पाप लागत नाही; परंतु मन व शरीराने विचारपूर्वक केलेली कृती निकाचित कर्म निर्माण करते. हे कर्म आपणास कमी व्हावे, यासाठी तप, दान, जाप यांचे सहाय्य होते. नवकार महामंत्र, 24 तीर्थंकर व आपल्या इष्टदेवतेची पूजा आपणास कर्म गती सुनिती देते.

त्रि-दिवसीय महोत्सव
शासन चंडिका गुरुणी विजेंद्रकुमारी महाराज व कवी चंदनमुनी महाराज यांचा स्मृतीदिन 2 सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त त्रि-दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवांतर्गत 24 तास जप, सामूहिक एकासना दिवस, बेटी बचाओ नाटिका, भक्‍ती के अमृत हा भक्‍तीसंगीत कार्यक्रम आहे.
उप प्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि साध्वी वसुधाजी व इतर साध्वींच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, शांतीलाल शाह, विजय कर्नावट यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)