“आप’च्या खासदारांकडून बोरी बुद्रुकची पाहणी

बेल्हे- आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजयसिंह यांनी बोरी बुद्रुक येथे भेट देऊन गावाची पहाणी केली. आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शिवारातील उत्खननात ज्वालामुखीच्या राखेचे आणि अश्‍मयुगीन काळातील दगडी हत्यारांविषयी माहिती घेतली. यावेळी सरपंच पुष्पा कोरडे, ज्ञानेश्वर शेटे, रखमा जाधव ,कैलास काळे, अकबर चौगुले, हुसेन चौगुले, विघ्नेश जाधव, ग्रामसेवक फाकटकर आदी उपस्थित होते. सरपंच पुष्पा कोरडे यांनी कुकडी नदीच्या तीरावर आढळून आलेल्या उत्खननात ज्वालामुखीच्या राखेची आणि अश्‍मयुगीन काळातील दगडी हत्यारांविषयी माहीती दिली. खासदार संजयसिंह यांनी केंद्रीय पुरातत्वीय खात्याचे मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन येथील परिसरात म्युझियम बनविण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान बोरी बुद्रुक, बोरी खुर्द गावांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)