आनेवाडी टोलनाक्‍यावर कारचा भीषण अपघात

मालट्रकला दिली पाठीमागून धडक, चालक गंभीर
भुईंज, दि. 24 (प्रतिनिधी) – टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या मालट्रकला स्वीफ्ट कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास आनेवाडी टोलनाक्‍यावर घडला.
अधिक माहिती अशी, आनेवाडी टोलनाक्‍यावर सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एक माल ट्रक टोल भरण्यासाठी लेन उभा होता. याच दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्वीफ्ट कारने या ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. तसेच कारचालक समीर जैनुर मकांदर (वय 35, रा. हुबळी, जि. धारवाड (कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच भुईंज पोलिस ठाण्याचे हवालदार बापूराव धायगुडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनाचे पंचनामा करून ताब्यात घेऊन भुईंज पोलीस ठाण्यात लावली आहेत. अपघातानंतर कारचालकाला उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातप्रकरणी मालट्रक चालक राज कुमार वेदाच्चलम नामक्कल (वय 39, रा. मुथ्थुगपट्टी (तामिळ नाडू) यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास हवलदार बापूराव धायगुडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.