आनंद एम्प्रोस स्कूलचा क्रीडा दिन उत्साहात

पिंपरी – येथील आनंद एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीसे मिळविली. विद्यार्थ्यांनी मल्लखांब, दोरीवरील मल्लखांब, लेझीम, पिरॅमिडची प्रात्यक्षिके सादर केली. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी रिबीन नृत्य, एरोबिक्‍स सादर केले. भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचेही सादरीकरण झाले. देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. प्रमुख पाहुणे म्हणून हॉकीपटू व प्रशिक्षक श्रीधरन तंबा उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी ध्वजारोहण केल्यावर विद्यार्थ्यांचे संचलन झाले. शपथविधीनंतर क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली. प्राचार्य इशतियाक शेख व सीतालक्ष्मी अय्यर यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा प्रशिक्षक अंकुश कांबळे व इतर शिक्षकांनी संयोजन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.