आनंद आणि बाबू मोशॉय 

– धनंजय 

स्थळ- वर्षा बंगला; वेळ – साम दाम दंड भेद न करण्याची
एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या चढाओढीचे, कॅन्सरच्या जीवघेण्या आजारात कधी रूपांतर झाले हे दोघांनाही कळले नाही व युती राहते की जाते अशी अवस्था निर्माण झाली. एवढी सुदृढ युती या दुर्धर आजारामुळे अंथरुणाला खिळली अन चार वषापूर्वीचे आनंदी वातावरण “आनंद’ चित्रपटाप्रमाणे उदासवाणे झाले. साम दाम दंड भेदचा नारा देऊन थकून भागून कारभारी अंतःपुरात आले. निपचित पडलेल्या युतीकडे निर्विकारपणे बघितले व “सारेगामा’वर आवडते गाणे लावले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘जिंदगी… कैसी है पहेली हाए, कभी ये हसाए, कभी ये रुलाए…!
असे कसे झाले? कुणी सुरुवात केली? कोणी काड्या केल्या? कोणी नेमके आवरते घ्यायला हवे होते? असे एक ना अनेक अनुत्तरित सवाल मनात घेऊन डोक्‍याचे भजे (पकोडे) झालेले आहे. या क्षणी कुणी जादुगार वा डॉक्‍टर हवा होता जो आधार देकर व युतीचा जीव वाचवेल असा विचार मनात येताच दारातून हाक आली – ‘बाबू मोशॉय… मी आलो आहे.’

‘कोण? अरे वा डॉक्‍टर नितीन, डायरेक्‍ट महाल-नागपुरातून? युतीने “आनंद’ मिळण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. युतीचा ‘आनंद’मधील राजेश खन्ना झाला आहे हो.’
‘बाबू मोशॉय! हम सब इस रंगमंच की कठपुतलीयां है, जिनकी डोर उपरवाले के हाथ मे है. कब किसकी डोर खिंच ले….’
‘उपरवाले आपणच ना? आपल्याला जास्त सिट मिळाल्या म्हणून तर मुख्यमंत्रिपद…’
‘बाबू मोशॉय! किती दिवस त्याचे कौतुक अजून? युती मरणासन्न अवस्थेत आहे, नुकसान व्हायचे चान्सेस आहेत, कावून इगो गोंजारता? युतीला सांभाळ ना बे.’
‘असे कावून बोलता डॉक्‍टर! ते पण तर तोल सोडून बोलतात.’
‘बाबू मोशॉय! म्हणून का एकदम साम दाम दंड भेद? अहो थर्ड स्टेजला आहे युती. थोडे पथ्यपाणी सांभाळाल की नाही? आपल्याले जिंदगी लंबी पण पाहिजे, अन बडी भी काय?
‘काय करावे डॉक्‍टर? ‘

‘मी पुढाकार घेतो. गड राखायचा आहे. तुम्ही पण लगाम लावा, भावना आवरा. खुणगाठ बांधा ‘आनंद कभी मरते नही ‘बी पॉझिटिव्ह.’
‘थॅंक्‍यू डॉक्‍टर, तुमच्या बोलण्याने धीर आला बरं. तुम्ही पुढाकार घेऊन इलाज सुरू करा, आम्ही पथ्य सांभाळतो.’
डॉक्‍टर नितीन समाधानाने हसतात, बाहेर उभा असलेल्या फुगेवाल्याकडून वीस रुपयाचे दहा फुगे घेतात व गडकरी वाड्याकडे प्रस्थान करतात.
बंगल्यातून सारेगामा कारवावर नवे गीत ऐकू येते –
‘कहीं दुर जब दिन ढल जाए , सांझ की दुल्हन बदन चुराए …
मेरे खयालो के आंगन में,कोई सपनो के दिप जलाए, दिप जलाए…’
कारभारीपण समाधानाने शीट्टी मारीत बंगल्यात दाखल होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)