आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा ! ; जपानने मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट रोखला

अखेर मोदी सरकारने नाही तर जपान कंपनीने शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत. बुलेट ट्रेन साठी दिली जाणारी मदत रोखली आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नावर जपान पाणी फिरवत असल्याचे दिसत आहे. जपानने नरेंद्र मोदींना झटका दिला असून बुलेट ट्रेनला आर्थिक मदत करणाऱ्या जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीने आता मदत रोखली आहे. पालघरच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता. त्यामुळे आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावा, अशे जपान कंपनीने मोदी सरकारला ठणकावले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जपानमध्ये सध्या आर्थिक मंदी सुरू आहे. ती दूर करण्यासाठीच केंद्र सरकारने अहमदाबाद-मुंबई हा बुलेट ट्रेनचा घाट घातला. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची फक्त ३ स्थानके आहेत. बुलेट ट्रेनचा अवघ्या ३५ मिनिटांचा प्रवास हा महाराष्ट्रातून होतो. मग महाराष्ट्राने निम्मे पैसे का द्यायचे, असा सवाल देखील  शरद पवार यांनी उपस्थित केला होता.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन साठी १ लाख कोटी रुपयांचा खर्च येणार असून यामध्ये जपान कंपनी ८८ हजार कोटी रुपयांची मदत करणार आहे. मात्र कंपनीने आता आता आर्थिक मदत रोखल्यामुळे मोदी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. कारण २०२२ पर्यंत बुलेट ट्रेनच काम सुरु करण्याचं ध्येय सरकारने ठेवले आहे.

या प्रकल्पासाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहण करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. अखेर मोदी सरकारने नाही तर जपान कंपनीने शेतकऱ्यांच्या समस्यां लक्षात घेत. बुलेट ट्रेन साठी दिली जाणारी मदत रोखली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)