आधारसक्तीमुळे दहशतवाद्यांची घुसखोरी थांबली का?

ममतांचा मोदींना सवाल
कोलकाता – केंद्र सरकारने प्रत्येक कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे, त्याला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा जोरदार आक्षेप घेतला आहे. आधार सक्तीच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशातील दहशतवाद्यांची घुसखोरी कमी झाली काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

आधार कार्ड सक्तीचे करताना त्यामुळे देशातील विदेशी अतिरेकी आणि नागरीकांची घुसखोरी कमी होईल असाही दावा केला गेला होता. त्या पार्श्‍वभूमीवर ममतांनी आज पुन्हा हा सवाल उपस्थित केला आहे. नागरीकांची व्यक्तीगत महिती आधार कार्डाशी जोडणे धोकादायक आहे असेही त्यांनी म्हटले होते. ममतांचा आधार सक्तीला पहिल्यापासूनच विरोध असून त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)