आधारकार्डसाठी पहाटेपासून रांगा

उरूळी कांचनमधील स्थिती : नागरिक मेटाकुटीला

उरुळी कांचन- हवेली तालुक्‍यातील उरुळी कांचन येथे आधार कार्ड काढण्यासाठी गावातील हनुमान मंदिरातील पोस्ट कार्यालयात पहाटे पाचपासूनद रांगा लागत आहेत. अनेक विद्यार्थी शाळेत न जाता आधार कार्ड काढण्यासाठी रांगेत थाबंत आहेत. त्यामुळे उरूळी कांचन परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. पूर्व हवेलीतील उरूळी कांचन हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे.

येथे आधार कार्ड काढण्यासाठी पोस्ट कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. त्यामुळे येथील पोस्ट कार्यालयात नागरिक आणि विद्यार्थी पहाटेपासून रांगा लावत आहेत. त्यात नागरिक व विद्यार्थी भरडले जात आहेत. आधार कार्ड काढण्याची परवानगी इतरांना द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावातील काळभैरवनाथ मंदिरात पोस्ट कार्यालय आहे. गावातील एकमेव आधार कार्ड काढण्यासाठी ठिकाण असल्याने पहाटे तीनपासून अनेकजण रांगेत उभे राहत आहेत.

नागरिकांनी सांगितले की, आम्ही पहाटेपासून रांगेत उभे राहत आहे. मागील दोन दिवसांपासून आम्ही येऊन रांगेत उभे राहतो. अनेक वेळा येथे विद्युतपुरवठा खंडीत झाल्यावर तसेच रेंज उपलब्ध नसल्यास अनेकवेळा परत जावे लागत आहे. तसेच दुसरे ठिकाण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आधारधारकांनी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×