आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा मिळणे गरजेचे

मंचर – घोडेगाव परिसरातील रूग्णांना उत्तम सेवा मिळणे गरजेचे आहे. हा आदिवासी डोंगरी भाग असल्याने आरोग्य सेवेबाबत येथील आदिवासी बांधव जागरूक नाहीत. त्यासाठी आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी डोंगरी भागात प्राध्यान्याने आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे, असे मत बी. व्ही. जी. लिमिटेडच्या संचालिका वैशाली गायकवाड यांनी व्यक्त केले.
घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाने बी. डी. काळे महाविद्यालयात यावर्षी नव्याने सुरू केलेल्या व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या सर्टिफिकेट कोर्स इन नर्सिग केअरच्य उद्‌घाटन वैशाली गायकवाड यांनी केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित काळे होते. यावेळी संस्थेचे सचिव ऍड. मुकूंद काळे, डॉ. कैलास डोंगरे, डॉ. विजय लोहकरे, क्रानिअर कंपनीच्या संचालिका डॉ. कल्याणी कुलकर्णी, पांडुरंग महाराज, संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम काळे, खजिनदार शिवाजीराव घोडेकर, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन डॉ. विलास काळे, समन्वय समितीचे चेअरमन संतोष भास्कर, न्यू इंग्लिश स्कूल समितीचे चेअरमन ऍड. संजय आर्विकर, संचालक जयसिंगराव काळे, शिवदास काळे, जितेंद्र जोशी, सोमनाथ काळे, सखाराम काळे, निलेश काण्णव, सरपंच क्रांती गाढवे, वसंत काळे, डॉ. गीता कुलकर्णी, प्राचार्य सुरेश काळे, मुख्याध्यापक भगवान माळवे, सेंटरचे प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम काळे, प्रा. चांगुणा कदम, प्राचार्य डॉ. आय. बी. जाधव, मेरीफ्लोरा डिसोझा, डॉ. शांताराम काळे, डॉ. शांताराम हगवणे, डॉ.विनायक पोखरकर, डॉ. गोमती काण्णव, शशिकला काळे, विनोद शहा, मुकूंद काळे, नितीन काळे, दत्ता झुंजुरके, बाळासाहेब काळे, गणेश काळे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)