आदिवासी नागरिकांनी डॉक्‍टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत – डॉ. घोलप

मंचर- आदिवासी नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा वैदू, मांत्रिक, भोंदू घेतात, त्यामुळे अंधश्रद्धा वाढली आहे. आदिवासी बांधवांनी वैद्यकीय उपचारासाठी डॉक्‍टरांकडे जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. घरगुती उपचारांना फाटा द्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. तेजस घोलप यांनी केले.

गोहे खुर्द (ता. आंबेगाव) येथे घोडेगाव येथील बी. डी. काळे महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या गावात आरोग्य दिन उत्साहात पार पडला झाला. “नैराश्‍य : एक आजार’ या विषयावर डॉ. तेजस घोलप यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त सगाव तेथे मानसोपचार’ या राज्यव्यापी मनःस्वास्थ जनजागृती उपक्रमातंर्गत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या व्याख्यान डॉ. घोलप बोलत होते. नैराश्‍य कशामुळे येते, त्यावर उपाय काय आहेत, हे त्यांनी ग्रामस्थांना समजून सांगितले. औषधोपचार, समुपदेशन, विद्युतोपचार आदींचा वापर ग्रामस्थांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी ग्रामस्थांनी प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातून शंका व माहिती जाणून घेतली. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. बी. एम. पवार, माजी पोलीस पाटील दामू कृष्णा,पोलीस पाटील चिंतामण मारुती डामसे, मारुती धुमाळ, संदीप साबळे उपस्थित होते. भैरवनाथ आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघाने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आय. बी. जाधव यांनी केले. आभार महेश गाडेकर यांनी मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.