आत्म्याशी संवाद साधा परमात्माचे दर्शन घडेल!

– हभप केशव महाराज शिवडेकर : गजानन महाराजांच्या प्रकटदिन सोहळा

पिंपरी – कायम अभासी तंत्रज्ञानाने, जीवनातील मौल्यवान वेळ वाया घालवून खोटा संवाद साधण्यापेक्षा क्षणभर मनापासून आत्माशी संवाद साधला, तर परमात्माचे दर्शन घडेल व जीवन सार्थकी लागेल, असे मार्गदर्शन हभप केशव महाराज शिवडेकर (गोवा) यांनी केले.

श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या 141 व्या प्रगटदिनानिमित्त तानाजीनगर चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत गुरुवारी (दि.21) श्रींच्या गाभा-यात “तुळजा भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना’ ही आकर्षक पूजा बांधण्यात आली. यावेळी निरुपण करताना शिवडेकर यांनी फेसबूक, व्हॉस्टअप अशा सोशल मीडियावर दंग झालेल्या तरुण पिढीला मार्गदर्शन केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये दि. 20 फेब्रुवारी, बुधवारी पहाटे 5.30 वाजता श्रींना औषधी द्रव्यांसह सुगंधी जलाचा अभिषेक, पुजन व मंगलस्नान आदी कार्यक्रम करण्यात आले. दुपारी ज्ञानवर्धिनी शारदा, नवचेतना व माऊली भजनी मंडळ यांनी भजन सादर केले. तर काल शुक्रवार दि. 22 रोजी डॉ. सजंय उपाध्ये (पुणे) यांचे मार्गदर्शन झाले. तर शनिवारी (दि. 23) ह.भ.प. प्रा. विलास गरवारे (सातारा); रविवार (दि. 24) अखंड चोविस तास पारायण, सोमवारी (दि. 25) सकाळी 9 वाजता ह.भ.प. अनंत महाराज शास्त्री दैठणकर (परभणी) यांचे कीर्तन. दुपारी 11.45 वाजता श्रींची प्रगटवेळ व गजर, दुपारी 12 वाजता श्रींची महाआरती नंतर सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसाद, रात्री 10.30 वाजता पसायदानाने महोत्सवाची सांगता होणार आहे. कार्यक्रमांच्या आयोजनात श्री गजानन सत्संग मंडळांचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह प्रताप भगत, सहकार्यवाह श्रीपाद जोशी, खजिनदार विष्णू पूर्णये, सहखजिनदार दत्तात्रय सावकार, सल्लागार रमाकांत सातपुते, श्रीकांत अणावकर, सभासद बाळकुष्ण मराठे, संजय खलाटे, देविदास कुलथे व गजानन भक्तगण व सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.