आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे दामिनी पथकाने वाचवले प्राण

पुणे, दि.19 – कौंटुंबीक वादाचा राग मनात धरून पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव दामिनी पथकाने वाचविला. शुक्रवारी दुपारी ही घटना निलायम पुलावर घडली.
दामिनी पथकाच्या महिला पोलीस कर्मचारी स्वाती डुकरे व श्वेता कदम या जनता वसाहत परिसरात पेट्रोलिंग करत होत्या. यावेळी निलायम पुलावरून जात असताना मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसली. त्यामुळे महिला पोलिसांनी विचारपूस केली. यावेळी एक महिला येथून उडी मारण्याचे तयारीत होती, परंतु, नागरिकांनी अडविले, अशी माहिती मिळाली. यामुळे त्या महिलेला ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी केली घरगुती कारणावरून झालेल्या वादातून हे पाऊल उचलल्याचे समजले. यानंतर महिलेची समजूत काढत तीच्या पतीचा क्रमांक मिळवून त्यांना संपर्क केला. दोघांचा वाद मिटवून त्यांना मार्गदर्शन करुन घरी पाठवले. (फोटो -संदीप )

Leave A Reply

Your email address will not be published.