आता विमानातही जैव इंधन वापरण्याचे धोरण – गडकरी

नवी दिल्ली – आता विमानातही जैव इंधन म्हणजेच बायोफ्युएल वापरण्याचे विशेष धोरण केंद्र सरकारकडून आखले जात आहे अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली भारतातील पहिले विमान डेहराडून येथे उतरले ज्यात जैव इंधनाचा वापर केला गेला होता. त्याच्या आगमन प्रसंगी झालेल्या भाषणात गडकरी यांनी ही माहिती दिली.

स्पाईस जेट विमान कंपनीच्या या विमानाने 43 मिनीटांचा प्रवास केला आणि ते दिल्लीच्या विमानतळावर उतरले. त्यात बऱ्याच अंशी जैव इंधनाचा वापर केला गेला होता. त्या संबंधात बोलताना गडकरी म्हणाले की विमानांमध्ये हे इंधन वापरण्यास सुरक्षित आहे त्यामुळे याचा वापर करण्याच्या संबंधातील एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ते म्हणाले की विमानांमध्ये जवै इंधन वापरले गेले तर भारताचा तेल आयातीवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय विमान वाहतूक खात्याचे मंत्री सुरेश प्रभु हेही यावेळी उपस्थित होते. पर्यावरण पूरक आणि लोकांना परवडेल अशी विमान सेवा देशात देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. आजच्या या उड्डाणाबद्दल माहिती देताना स्पाईस जेट कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक अजय सिंह म्हणाले की आजची ही फ्लाईट चाचणीदाखल होती त्यातून इंधनाबाबतचा तांत्रिक बदल दाखवण्याचा इरादा होता तो पुर्ण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)