आता पाकिस्तानी लष्करही बनते आहे “मेड इन चायना’

नवी दिल्ली: सीपीईसीच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये चलनापासून शहरांपर्यंतचे चिनीकरण सुरू झाले आहे, आणि आता पाकिस्तानच्या लष्करावरही मेड इन चायनाचा शिक्का बसू लागला आहे. पाकिस्तान आपले लष्कर मजबूत बनवण्यासाठी चीनचे सहाय्य घेत आहे. पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर चार वेळा भारताशी युद्ध छेडले आणि चारही वेळा त्याला दारूण पराभवाला तोंड द्यावे लागले. भारताविरुद्ध विजय मिळणे शक्‍य नाही, याची जाणीव झाल्याने पाकिस्तानने चीनला बडे भैया बनवून त्याच्याशी जवळीक सुरू केली आहे.

गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानच्या लष्कराला प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) च्या 15-20 जवानांनी पाकिस्तानच्या ओकारा येथील 14 इन्फन्ट्री डिव्हिजन हेडक्वार्टर्सला भेट दिली. त्याचबरोबर बसीरपूर आणि सुलेमनकी येथील आघाडीलाही त्यांनी भेट दिली. 23 सिंध आणि 21 सिंध ब्रिगेडच्या जवानांना चिनी लष्कराने प्रशिक्षण दिल्याची खबर आहे. हा भाग भारताच्या फजिल्दा सीमेच्या अगदी जवळ आहे.
अमेरिकेने आर्थिक मदत बंद केल्यापासून पाकिस्तान डबघाईला आलेला आहे. त्याला चीनमध्ये मदतकर्ता दिसत आहे. मात्र पाकिस्तानला चीनची चाल कळत नाहीए. चीन सोडून बाकी सारे दरवाजे तो आपणच बंद करू लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)