…आता डेंग्यूचा उद्रेक!

भीतीचे वातावरण : आरोग्य विभागापुढे आव्हान


33 डेंग्यूचे रुग्ण आढळले

पुणे – वाढती थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असताना, डेंगीच्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठ दिवसांत शहरात 33 जणांना डेंग्यूची लागण झाली असून चिकनगुणियाचे 5 रुग्ण सापडले आहेत.

आजारांच्या वाढत्या विळख्याने नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली असून संसर्गजन्य आजाराने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत सर्दी, ताप, खोकला, घसा किंवा कणकणी जाणवल्यास तत्काळ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील वर्षभरात (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018पर्यंत) डेंग्यूचे 3 हजार रुग्ण सापडले असून ऑगस्ट, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांत सर्वाधिक रुग्णांची संख्या आढळून आली आहे. उन्हाळ्यामध्ये डेंग्यू अक्षरश: थैमान घालतो. त्यातच शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे रक्तदानाची संख्या कमी होते आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी आवश्‍यक प्लेटलेटची कमतरता भासू लागते. त्यामुळे नागरिकांनी आतापासून सावधानता बाळगत पाण्याचे साठे होणार नाहीत आणि डेंग्यूच्या डासांची पैदास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरिया या आजाराने शहराला विळखा घातला असून त्यावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. वातावरणात बदल होताच प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे काही रुग्णांना या आजाराला बळी जावे लागत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागानेही सर्व यंत्रणा कार्यान्वित ठेवून वेळोवेळी औषध फवारणी करणे आवश्‍यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)