…आता डिंभे, वडिवळे धरणातूनही गळती

जबबदार कोण? : पावसाळ्यानंतर केली जाणार दुरुस्ती

पुणे – वडिवळे आणि डिंभे धरणातूनही पाणी गळती सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे. दरम्यान, या दोन्ही धरणांमधील गळती थांबवण्यासंबंधीची कामे पावसाळ्यानंतर करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंबेगाव, जुन्नर तालुक्‍यांना डिंभे धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. तर, वडिवळे धरणातून आळंदी आणि देहू तीर्थक्षेत्रांना पाणीपुरवठा केला जातो. घोड नदीवर डिंभे धरण बांधण्यात आले असून या धरणाची क्षमता 13.50 टीएमसी इतकी आहे. हे धरण 2000 मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले आहे. तर मावळ तालुक्‍यातील वडिवळे धरण बांधून चाळीस वर्षे झाली आहेत. या धरणाची क्षमता 1.44 टीएमसी इतकी आहे. या दोन्ही धरणांमधील दगडांमधून भराव निघून जात असल्याने धरणामधून पाणी गळती सुरू झाली आहे. डिंभे आणि वडिवळे दोन्ही धरणांच्या दुरूस्तीच्या कामांसाठी जलसंपदा विभागाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. धरणांच्या दुरूस्तीसाठी नेमका किती खर्च येणार आहे, याबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

याविषयी माहिती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी सांगितले, “राज्यातील सर्व धरणांची दरवर्षी नियमित डागडुजी करण्यात येते. डिंभे, वडिवळे या धरणांचे बांधकाम जुने असल्याने काही वर्षांनंतर दोन दगडांमधील भराव निघून जाण्याची शक्‍यता असते. टेमघरप्रमाणे मोठी गळती या दोन्ही धरणांमधून नाही. पावसाळ्यानंतर दोन्ही धरणांची कामे सुरू करण्यात येतील.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)