आता अर्जुन कपूर साकारणार निगेटिव्ह रोल?

सिद्धार्थ मल्होत्राचा 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या “एक व्हिलन’ या चित्रपटाच्या सिक्‍वलबाबत सध्या बॉलीवूडमध्ये विविध चर्चा रंगत आहे. मोहिल सूरी दिग्दर्शित होणा-या या चित्रपटाच्या सीक्‍वलमध्ये अर्जुन कपूरला सिद्धार्थ मल्होत्राच्या जागी रिप्लेस करण्यात आल्याचे समजते. या चित्रपटाला मोहित सुरी डायरेक्‍ट करणार आहेत, तर एकता कपूर प्रड्यूस करणार आहे.

दरम्यान, चित्रपटासंबंधीत एका व्यक्‍तीने या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. या चित्रपटाच्या प्रड्यूसर्सने सिद्धार्थ आणि अर्जुन या दोघांची भेट घेतली असून सिद्धार्थ मल्होत्राला या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारण्यासाठी अप्रोच केले आहे. तर अर्जुन कपूर निगेटिव्ह भूमिका साकारण्याची शक्‍यता आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही निश्‍चित झाले नसून या दोन्ही कलाकारांशी चित्रपटाबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिद्धार्थ मल्होत्रा सध्या लखनौमध्ये त्याच्या आगामी “जबरिया जोडा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत सिंह करत आहे. तर चित्रपटात परिणीति चोप्रा मुख्य हिरोईन आहे. दुसरीकडे अर्जुन कपूर त्याच्या “नमस्ते इंग्लंड’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपट 2007मध्ये प्रदर्शित झालेल्या “नमस्ते लंडन’चा सिक्‍वल असून त्याचे दिग्दर्शन विपुल अमृतलाल शाह यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)