आण्विक कार्यक्रम बंद केल्याशिवाय उत्तर कोरियाला कोणतीही सवलत नाही

वॉशिंग्टन (अमेरिका) – उत्तर कोरिया आपले आण्विक आणि क्षेपणास्त्रांचे कार्यक्रम प्रत्यक्ष बंद करत नाही, तोपर्यंत अमेरिका त्याला निर्बंधांतून कोणतीही सवलत देणार नाही. किम जोंग उनने अमेरिकेला सहजपणे बनवता येईल असे समजण्याची चूक करू नये, असे उत्तर कोरियावर अप्रत्यक्ष हल्ला करत व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव सारा सॅंडर्सने म्हटले आहे.

उत्तर कोरियाने या आठवड्यात आपलेआण्विक आणि क्षेपणास्त्रांचे कार्यक्रम बंद करण्याची घोषणा केला आहे. ही घोषणा प्रगतीचे सूचक असल्याचे डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. मात्र जोपर्यंत उत्तर कोरिया आपले आण्विक आणि क्षेपणास्त्रांचे कार्यक्रम प्रत्यक्ष बंद करत नाही, तोपर्यंत आम्ही सवलत देण्याचा विचार करू शकत नाही, मागील सरकारने केलेल्या चुकांची पुनरुत्पत्ती हे सरकार करणार नाही, असे सारा सॅंडर्स यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाच्या शब्दांवर आम्ही विसंबून राहणार नाही. कोरियन द्वीपकल्प परमाणुमुक्त झालेले आम्हाला बघायचे आहे, असे त्यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)