आणखी एक कॉंल सेंटर घोटाळा उघडकीस…

7 जणांना अटक

ठाणे – अमेरिका आणि अन्य देशांमधील नागरिकांची करविषयक माहितीवरून दिशाभूल करणारे एक कॉल सेंटरचे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील नागरिकांची अशाचप्रकारे फसवणूक करणारे असेच एक प्रकरण ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोपनीय महितीच्या अधारे पोलिसांनी मीरा रोड भागातील एका कॉल सेंटरवर छापा घातला आणि 7 जणांना अटक केली, असे सहायक पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 खाली फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली नवघर पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच काही कॉम्प्युटरही जप्त करण्यात आले आहेत.

2016 साली ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अशाच स्वरुपाचे बनावट कॉल सेंटर उघड केले होते. त्यामध्ये मीरा रोडवरील कॉल सेंटरमधील आरोपींनी अमेरिकेतील 6,400नागरिकांची लक्षावधी डॉलरची फसवणूक केली होती. या प्रकरणी आरोपी अमेरिकेतील नागरिकांना महसूल अधिकारी असल्याचे भासवून कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदीवरील करांची मागणी करायचे.
काय करायचे आरोपी?

या कॉल सेंटरमधून विदेशी नागरिकांची आर्थिक स्थिती, कर्ज आणि पगार इत्यादीची माहिती मिळवली जायची. त्यानंतर त्याच नागरिकांच्या देशातील कर अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या लोकांकरवी या नागरिकांशी संपर्क साधला जायचा आणि “लोन टॅक्‍स’चे देणे लागू असल्याचे सांगितले जायचे. हा कर बिटकॉईनच्या स्वरुपात दिला जावा, असेही सांगितले जायचे. बिटकॉईन हे इलेक्‍ट्रॉनिक चलन असून बहुतेक सेंट्रल बॅंकांमध्ये त्याला मान्यता नाही.

अशा प्रकारे बिटकॉईनच्या माध्यमातून आरोपींनी किती जणांकडून किती पैसे उकळले आहेत, याचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)