आडसाली ऊस उत्पादन तंत्रज्ञान शेती बनवू किफायतशीर 

* नेहमीच्या पद्धतीने खत देण्याचे वेळापत्रक : अ.न.खत देण्याची वेळ युरिया बॅग सिंगल सुपर म्युरेट ऑफ पोटॉश
* सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर : ऊस पिकासाठी मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो व गंधक 25 किलो प्रति एकर लागवडीला वापरावे. सूक्ष्म अन्न द्रव्यामध्ये फेरस सल्फेट 10 किलो झिंक सल्फेट8 किलो व बोरॉन 2 किलो शेणखत किंवा गांडूळ खातात मुरून द्यावे. ऊस लागवडीनंतर किंवा ऊस तुटून गेल्यानंतर 60,90 व 120 दिवसांनी ज्ञानेश्‍वर शक्ती (8:8:8) अधिक ज्ञानेश्‍वर उर्जा (सूक्ष्म अन्नद्रव्य) या खतांची प्रत्येकी 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* ऊस शेतीमध्ये संजीवकांचा वापर :(संजीवनी तंत्रज्ञान) : ऊसाचे विक्रमी उत्पादन घेण्याच्या विविध विविध पद्धतीबरोबरच फवारणीद्वारे पिक पोषण करणे हि काळाची गरज झाली आहे कारण जमिनीतून कितीही अन्नद्रव्ये दिली तर ती ऊस पिकाला लागू होतील असे नाही. त्यासाठी मुख्य,दुय्यम व जीए, सिक्‍सबीए यांच्या संयुक्त फवारण्याने पिकास देणे आवश्‍यक आहे.
त्यामुळे पिक वाढीचा जोम वाढतो,भरपूर फुटवे येतात व ते शेवटपर्यंत टिकून राहतात,पाने लांब व रुंद होतात, क्‍लोरोफिलचे प्रमाण वाढते, प्रकाश संश्‍लेषण क्रिया वाढते, कांडी लांब, जाड व कांद्यांची संख्या भरपूर होतात, त्यात साखर साठविण्याची क्रिया वाढते, गवताळ वाढ रोखून धरली जाते, कोणत्याही किड अथवा रोगाचा संसर्ग झाला तर या पोषण संजीवकाच्या फवारणीतच कीडनाशक मिसळून देता येते.जमिनीतून दिलेले अन्नद्रव्य चांगले खेचून घेतले जाते, सतत मारत जाणाऱ्या फुटव्याना संजीवनी मिळते म्हणूनच या फवारणीस ऊस संजीवनी असे म्हणतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)