आठ भारतीय खलाशी जहाजावर अडकले

दुबई – संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई बंदरात आठ भारतीय खलाशी जहाजावर अडकले असून त्यांना नऊ महिन्यांचे पूर्ण वेतन मिळालेले नाही. तसेच या खलाशांना पुरेसे अन्न आणि इंधनही नाकारण्यात आल्याचे मंगळवारी उघडकीस आले असुन त्या खलाश्‍यांकडे संयुक्त अरब अमिरातीचा व्हिसा नसल्याने ते जहाजही सोडू शकत नाहीत अशी माहिती मिळाली आहे. आम्ही कसेबसे जिवंत आहोत आणि आमचे वजन सात ते आठ किलोंनी उतरले आहे.

आमच्यात आता काहीच ताकद उरलेली नाही. आमच्या कुटुंबालाही घरी त्रास होत आहे आणि सध्याची परिस्थिती तर इतकी वाईट आणि कठीण आहे, की आम्ही अक्षरश: आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत आलो आहोत, असे खलाशांपैकी एकाने सांगितले. आम्ही खलाशांच्या सतत संपर्कात असून, कंपनीकडूनही अडचण सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दुबईतील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले असून लवकरात लवकर त्या खलाश्‍यांना सुखरूप सोडवले जाईल अशी माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)