आज पक्षात माझी कोणाला किंमत नाही, कदाचित मी गेल्यावर कळेल: मुलायम सिंह

लखनौ: आज पक्षात माझी कोणाला किंमत नाही. कदाचित मी गेल्यानंतर माझी किंमत त्यांना कळेल असे मोठ्या उद्वेगपूर्ण मनस्थितीत समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी म्हटले आहे. शनिवारी समाजवादी विचारवंत भगवती सिंह यांच्या 86 व्या जन्मदिन समारंभात ते बोलत होते. राम मनोहरव्‌ लोहिया यांच्या बाबतीतही असेच झाले होते. जिवंतपणी कोणाला किंमत नसते असे ते नेहमी म्हणत असत, याची मुलायम सिंह यांनी आठवण करून दिली.

भगवती सिंह यांना त्यांच्या 86 व्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना मुलायम सिंह यादव यांनी अनेकन्‌ जुन्या आठवणींन उजाळा दिला.समाजवादी पक्षाच्या स्थापनेत भगवती सिंह यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. लोहिया, चंद्रशेखर, राजनारायण, मधू लिमये यांच्यासारख्या थोर नेत्यांच्या साथीने मी आणि भगवती प्रसाद यांनी मिळून काम केलेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी तर नेताजींचा नेहमीच आदर करत आलो आहे. आणि सर्वांनी केला पाहिजे, असे उद्गार शिवपाल यादव यांनी या प्रसंगी बोलताना काढले. मलाही पक्षात काही जबाबदारी दिली जात नाही, दीड वर्ष झाले आहे. शेवटी माणसाने वाट तरी किती पाहायची? असा प्रश्‍न त्यांनी केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भगवती सिंह यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)