आजी-माजी सैनिकांना मोफत वैद्यकीय सेवा

प्रजासत्ताक दिनी श्रीगणेशा हॉस्पिटलकडून अनोखा गौरव

शिरूर-त्यांनी सीमेवर आपले आयुष्य घालवले. डोळ्यांत तेल घालून आपले संरक्षण केले. अनेकवेळा शत्रूशी दोन हात केले. अशा आपल्या भारतीय जवानांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्या देशसेवेला सलाम आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची लहानपणापासूनच इच्छा होती आणि आज जीवनात काहीतरी झाल्यावर त्यांच्यासाठी काय देऊ शकतो तर आपल्या वैद्यकीय सेवेतून शिरूर तालुक्‍यातील आजी माजी जवानांसाठी वैद्यकीय सेवा मोफत. त्यांच्या कुटुंबीयांसाठी 50 टक्के दरात उपचार करणार असल्याचे शिरूर बाबुरावनगर येथील श्री गणेशा हॉस्पिटलचे डॉक्‍टर अखिलेश राजूरकर व डॉक्‍टर विशाल महाजन यांनी जाहीर करून एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. या जवानांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरवही केला. या आगळ्या वेगळ्या सत्काराने माजी सैनिकांना गहिवरून आले.
प्रजास्ताक दिनानिमित्त देशासाठी सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांचा श्री गणेशा हॉस्पिटलच्या वतीने विशेष सन्मान सोहळा आयोजित केला होता. आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीत ध्वज फडकावण्यात आला. यावेळी बंदुकीच्या हवेत फैरी झाडून ध्वजास सलामी देण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांचे डॉ. अखिलेश राजुरकर यांनी श्री गणेशा हॉस्पिटलच्या माध्यमातून शिरूर येथे हॉस्पिटल उभारणीनंतर सैनिक व सैनिक कुटुंबांसाठी आजतागायत सुमारे 14 लाख रुपये बिल माफ करत याद्वारे सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे काम केले आहे. पुढेही हे कार्य सुरू ठेवणार असल्याचे डॉ. राजुरकर यांनी सांगितले.
हॉस्पिटलच्या वतीने दत्तात्रय वाखारे, भुजंगराव कर्पे, बाळासाहेब शेवाळे, ज्ञानदेव धावडे, भास्कर चव्हाण, बी. एस. पवार, सुरेश जाधव, सोमनाथ सोनवणे, राजु हेलावडे, संजय कदम, गुलाबराव खरबस, निलेश सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, नंदकुमार सोनवणे, गहिनीनाथ डोंगरे, महादेव घावटे, नामदेव घावटे, भीमराव सोनवणे, शिवाजी औटी, बुवाजी खेडकर, गोरक्ष खेडकर, अनिल खेडकर, बंडु कोहोकडे, शिवाजी कोहोकडे, रंगनाथ नवले, सुभाष नवले, बबन फलके, शिवाजी फलके, प्रकाश कर्डिले, दशरथ गोऱ्हे, शिवाजी कापरे, शिवाजी फलके, राजु गोऱ्हे या सैनिकांचा सन्मानचिन्ह देउन विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज खरात, पंकज गायकवाड, ऋतुराज चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, प्रशांत नाईक, राजू नाईक यांसह हॉस्पिटलच्या स्टाफने विशेष परिश्रम घेतले.
यावेळी पराग कोळपकर, पत्रकार मुकुंद ढोबळे, पुष्पराज कोळपकर, गणेश कोळपकर यांसह नागरिक उपस्थित होते. हॉस्पिटलच्या डॉ. ऋचा घोंगळे यांनी प्रास्ताविक, डॉ. सागर केदारे यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. विशाल महाजन यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)