आजी, माजी भावी सहकाऱ्यांनो.. ; मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर सेना भाजप युतीचे पुन्हा पतंग

औरंगाबाद – माझ्या आजी, माजी आणि भावी सहकाऱ्यांनो… असा उल्लेख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला. त्यानंतर भाजपा – शिवसेना – भाजपा युती पुन्हा होणार असल्याचे राजकीय पतंग उडवण्यास राजकीय निरीक्षकांनी सुरवात केली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकेर बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
या विधानावरून भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते.

आजचे हे व्यासपीठ आणि कार्यक्रम पाहून मला समाझान आहे की आपण सगळेच जण राजकारण बाजूला ठेऊन जनतेच्या हिताच्या गोष्टी आपण करत आहोत. नाहीतर मराठवाडा मुक्तीदिन साजरा करायचा आणि आपापसात भांडण करायचे. मग निजामाला कशाला घालवलं? नालायकपणे कारभार करून आपणही तसेच वागत राहिलो, तर त्या आणि या राजवटीमध्ये काय फरक राहिला? अपेक्षा एकमेकांकडून असणारच आहेत, असे ठाकरे यावेळी म्हणले.

चंद्रकांत पाटील आमच्या संपर्कात!
पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील गुरूवारी म्हणाले, आपल्याला माजी मंत्री न म्हणण्याचा उल्लेख केला होता. मला माजी मंत्री म्हणू नका. तुम्हाला दोन-तीन दिवसांत कळेल. त्यावर टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणाले, ते राज्यात सत्तेत असणाऱ्या कोणत्या तरी एका पक्षाच्या संपर्कात असावेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.