आजपासून दहावीची परीक्षा सुरू

कुरकुंभ- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवार (दि. 1) पासून दहावीच्या परीक्षेला सुरवात होणार आहे. कुरकुंभ (ता. दौंड) येथे श्री फिरंगाई माता विद्यालय कुरकुंभ परीक्षा केंद्र असल्याने या ठिकाणी एकूण 315 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. या केंद्रात श्री भानोबा विद्यालय, कुसेगाव (92 विद्यार्थी) नवीन माध्यमिक विद्यालय, मळद (46 विद्यार्थी) आणि श्री फिरंगाई माता विद्यालय, कुरकुंभ (177 विद्यार्थी) असे एकूण 315 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी आवश्‍यक ती सर्व तयारी या केंद्राने केली आहे. हॉलमध्ये बेंचवर क्रमांक टाकणे, विद्यार्थ्यांना नंबर पाहण्यासाठी मोठ्या फलकावर क्रमांक लावून झाले आहेत, तसेच कॉपीसारखे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पर्यवेक्षक आणि परीक्षकांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात शुक्रवार (दि.1) सकाळी विद्यालयात विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रसंचालक नानासाहेब भापकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.