आजचे विद्यार्थी उद्याचे सुज्ज्ञ नागरिक

राजगुरूनगर- आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुज्ज्ञ नागरिक असल्याने विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तुंग भरारी घ्यावी, असे प्रतिपादन खेड तालुका शिवसेना प्रमुख प्रकाश वाडेकर यांनी केले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस व गुरु पौर्णिमेचे औचित्यसाधून सांडभोरवाडी-काळूस गटातील दहावी-बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ काळूस (ता. खेड) येथे पार पडला, त्यावेळी प्रकाश वाडेकर बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या विजया शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, पंचायत समिती सदस्या सुनिता सांडभोर, ज्योती अरगडे, महिला आघाडीच्या तालुका संघटक नंदा कड, पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव अरगडे, उद्योजक संतोष सांडभोर, काळूसचे सरपंच यशवंत खैरे, केशव अरगडे यांच्यासह सांडभोरवाडी-काळूस गटातील दहावी बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी, त्यांचे पालक शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रकाश वाडेकर म्हणाले की, चेहऱ्यावरील निरागस भाव, दिलेल्या वचनाला जागणारे, विरोधकांचा टीकेला जराही ढुंकुन न पाहणारे तसेच महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या राजकारणात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिर्घाआयुष्य मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव अरगडे, तर पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे यांनी आभार मानले.
दरम्यान, शिवसेना चाकण शहराच्या वतीने ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळवाटप करण्यात आले शिवसेना विभागप्रमुख मंगेश पऱ्हाड, शहरप्रमुख महेश शेवकरी, महिला आघाडीच्या विभाग संघटक कविता करपे, उपशहरप्रमुख अभिजीत जाधव, राजेंद्र खेडकर इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना पूर्व विभागाच्या वतीने शेलपिंपळगाव येथे संपर्क बालग्राम अनाथाश्रमातील मुलांसाठी विभागप्रमुख मंगेश पऱ्हाड यांनी धान्यवाटप केले. युवा सेनेचे चिटणीस धनंजय पठारे व उपतालुका युवा अधिकारी विशाल पोतले यांनी पळवाटप केले. यावेळी महिला आघाडीच्या नंदा कड, उपतालुकाप्रमुख बापूसाहेब थिटे, वाहतूक सेनेचे अमोल इंगळे, उपशहरप्रमुख राजेंद्र खेडकर, काळूराम दौंडकर, भाऊसाहेब दौंडकर, लक्ष्मण दौंडकर, सुभाष इंगळे, संदीप इंगळे, शाखाप्रमुख बाळासाहेब आवटे, भरत मोरे, सुनील मोरे यांच्यास शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

  • विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात संधी असल्याने आतापासून त्यांनी तयारी केली पाहिजे. रोजगार कसा मिळेल पुढे कसे जाता येईल याचा विचार करावा. पुढे जाताना त्यांनी गुरुजनांना नतमस्तक व्हावे, त्यांचे स्मरण करण्याची गरज आहे. आपल्या दैनंदिन जीवनात जे शिकायला मिळते ते आपले गुरु असतात. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आयएएस, आयपीएस अकादमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मोठी संधी दिली आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा.
    – प्रकाश वाडेकर, शिवसेना प्रमुख, खेड तालुका
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)