आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास…

2019 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान पार पडणार आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या निवडणुकाही हायटेक झाल्या आहेत. मतदारांच्या तक्रारी दूर करण्यासाठी, त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाने काही अॅप्स तयार केले आहेत. तसेच आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतची माहिती थेट आयोगाला कळवण्यासाठीही अॅप तयार करण्यात आले आहे.

सी व्हिजिल अॅप : सी व्हिजिल अॅपचा अर्थ आहे सिटिझन व्हिजिल. उमेदवारांकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्यासाठी हे अॅप विकसित करण्यात आले आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचे उल्लंघन होताना दिसले तर त्यासंदर्भातील अचूक फोटो किंवा व्हिडीओ तुम्ही या अॅपच्या साहाय्याने थेट निवडणूक आयोगाला पाठवू शकता.

दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी अॅप : हे अॅप दिव्यांग व्यक्‍तींसाठी तयार करण्यात आले आहे. या अॅपमध्ये दिव्यांग व्यक्‍ती नव्याने नोंदणी करू शकतात. तसेच निवासी पत्ता, नाव यांसह अन्य आवश्‍यक माहितीमध्ये बदलही करू शकतात. नव्याने दिव्यांगांच्या यादीत आपले नाव सहभागी करण्यासाठीही हे ऍप उपयुक्‍त आहे. नागरिकांनी आपल्या संपर्काची माहिती बूथ लेव्हल ऑफिसरना दिली तर ते घरी येऊन दिव्यांगांच्या तक्रारींचे निवारण करतील. दिव्यांग जर मतदान केंद्रापर्यंत जाण्यास सक्षम नसतील तर बूथ लेव्हल अधिकारी त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्थाही देतील.

कॅंडिडेट अॅप : हे अॅप उमेदवारांसाठी उपयुक्‍त आहे. या अॅपच्या साहाय्याने उमेदवारांना आपल्या नामांकनाची स्थिती पाहता येईल. तसेच निवडणुकीदरम्यान आवश्‍यक असणाऱ्या अनेक प्रकारच्या मंजुरीही घेता येतील. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी हे ऍअॅप फायदेशीर आहे. तथापि, त्यासाठी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन यासाठी संमती घ्यावी लागेल. त्यानंतरच नोंदणीकृत मोबाइलवर हे अॅप डाऊनलोड करता येईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.