आचारसंहिता संपताच टंचाईची तातडीची बैठक घ्या

सभापती, उपसभापती यांची गटविकास अधिकाऱ्यांना सूचना

सातारा, दि 16 प्रतिनिधी- सातारा तालुक्‍यात अद्याप काही गावांमध्ये अवकाळी पावसाचे दर्शन झाले नाही. कडक उन्हाळा पडला असून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर टंचाईची तातडीची बैठक घेण्याच्या सूचना सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तालुक्‍यातील काही रस्त्यांचे पॅचिंग, अतित तेथे होणारे दोन तासाचे भारनियमन, रस्त्यावर असलेले विजेचे खांब काढण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
सातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली उपसभापती जितेंद्र सावंत गटविकास अधिकारी अमिता गावडे – पाटील आणि सदस्यांच्या उपस्थितीत आज झाली.

सभेच्या प्रारंभी तालुक्‍यात निर्माण झालेल्या टंचाई परिस्थितीकडे संजय घोरपडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शेतीसाठी पाटबंधारे विभाग मनमानी पणाने पाणी सोडत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सध्या एप्रिलचा कडक उन्हाळा सुरू आहे. प्रशासन टंचाई परिस्थितीवर कशी मात करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जितेंद्र सावंत म्हणाले, आचारसंहिता सुरू असल्याने कोणताही निर्णय घेता येणार नाही. आचारसहिता संपल्यानंतर पाटबंधारे आणि महसूल विभागाची संयुक्त टंचाई बैठक आयोजित करण्यात यावी. या बैठकीचे पत्र जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाला पाठवावे.

शहर वीज वितरण विभागाच्या आढाव्यात एप्रिल मध्ये साताऱ्यात घरगुती तर व्यावसायिक विजेचे कनेक्‍शन देण्यात आल्याची माहिती दिली. जितेंद्र सावंत म्हणाले, अनेक ठिकाणी रस्त्यावर विजेचे खांब असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. बांधकाम विभागाने सूचना करूनही तुम्ही रस्त्यावर खांब का लावता. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने नविन विज कनेक्‍शन देत असताना रस्त्यावर खांब येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत असल्याचे निदर्शनास आणले. ग्रामीण विज वितरणच्या आढाव्यामध्ये मागणीप्रमाणे नागरिकांना विज कनेक्‍शन देण्यात आले असून केवळ हजार रुपये अनामत घेऊन कनेक्‍शन देण्यात आली असल्याचे सांगितले. संजय घोरपडे म्हणाले, सातारा तालुक्‍यातील अतित येथे कॅनलला पाणी नसतानाही ते विजेचे भारनियमन केले जाते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अतिरिक्त करण्यात आलेले भारनियमनाचे तास भरून काढण्यात यावे.
बांधकाम विभागाच्या आढाव्यामध्ये नागठाणे परिसरातील रस्त्यांचे पॅचिग करा, गवळी ते रायघर रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. शिक्षण विभागाच्या आढाव्यामध्ये तालुक्‍यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. एकूण शिक्षक मंजूर आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये बाल मेळावे घेण्यात आले असून एप्रिल रोजी किशोरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. लघुपाटबंधारे विभागाच्या आढाव्यामध्ये डीपीडीसीच्या माध्यमातून तासगाव, बामणवाडी येथे हाती घेतलेल्या साठवण बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. एकूण कामे मंजूर आहेत, पूर्ण झाले असून कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती देण्यात आली. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आढाव्यामध्ये तालुक्‍यात अंगणवाड्या असून त्यामध्ये सेविका तर तेवढ्याच मदतनीस काम करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या जागा रिक्त आहेत. स्मार्ट अंगणवाडीचे टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.