आगामी काळात स्पर्धा आयोगाचे काम वाढणार 

कंपन्यांदरम्यान संतुलित स्पर्धा असण्याची आवश्‍यकता 
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था जसजशी विस्तारत जाईल तसतसे स्पर्धा आयोगाचे कामही वाढत जाईल, असे मत केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षेत्रात विकासाशी निगडित नियमनाची गरज आहे, त्यादृष्टीने स्पर्धात्मक वातावरणात खरेदी बाजारपेठेचे नियमन विविध संस्थांशी समन्वय आणि विलय अशा सर्व गोष्टी हाताळण्यासाठी एक नियामक यंत्रणा अत्यंत आवश्‍यक आहे. अनेक उद्योग समूहांनी मिळून उत्पादनांची किंमत वाढवणे किंवा आपल्या प्रबळ स्थानाचा दुरुपयोग करून किमतींवर परिणाम करत स्पर्धा कमी करणे, अशा गोष्टी रोखण्यासाठी दिवसेंदिवस स्पर्धा आयोगाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे असे ते म्हणाले.
देशाच्या सर्वांगीण विकासाचा समतोल राखणे अत्यंत आवश्‍यक असून त्यासाठी तुलनेने मागे राहिलेल्या ईशान्य भारताकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, ईशान्य भारताचा वेगाने विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरु असून आता त्या भागाचा विकास होण्याची अपेक्षा आहे, असे जेटली यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष सुधीर मित्तल आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढील वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.
तसेच ही उभारी घेताना ब्रिटनलाही भारत मागे टाकेल. तर, 2040 मध्ये भारताचा तीन विशाल अर्थव्यवस्थांमध्ये क्रमांक लागेल असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
जेटली म्हणाले, भारतात दरडोई उत्पन्न हे कमी राहील. मात्र अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड मोठा असल्याने ती वेगाने अधिक विकसित होत आहे. या वर्षी आकाराच्या रुपात आपण फ्रान्सला मागे टाकले आहे. पुढील वर्षी आपण ब्रिटनलाही मागे टाकू आणि जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेची नोंद होईल.
जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत खूपच धीम्या गतीने विकसित होत आहेत. त्यांची अर्थव्यवस्था एक ते दीड टक्‍क्‍यांनी वाढत आहे. जर आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात सात ते आठ टक्‍क्‍यांनी वाढ होत असेल तर या अर्थव्यवस्थांना मागे टाकायला आपल्याला फार काळ लागणार नाही.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)