आगामी अर्थसंकल्पातच गरिबांसाठी उत्पन्न योजना?

नवी दिल्ली: केंद्र हंगामी अर्थसंकल्पात गरिबांसाठी किमान उत्पन्न देणारी योजना जाहीर करण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी तशी योजना आणण्याचे आश्‍वासन दरम्यानच्या काळात दिले आहे. त्यामुळे अशा योजनेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ही योजना लागू केल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी केंद्र व राज्यांच्या एकत्रित जीडीपीच्या 0.7 टक्के इतका म्हणजे 1.5 लाख कोटी रुपयांचा बोजा पडेल असा अंदाज आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका सभेत बोलताना जर 2019 मध्ये कॉंग्रेस सत्तेत आली तर प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्न देणारी योजना आणेल असे जाहीर केले. यामुळे आता भाजपा सरकार येत्या बजेटमध्ये ही योजना सादर करेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
कर्ज माफ करण्यापेक्षा उत्पन्नाच्या माध्यमातून आधार देणारी योजना केव्हाही चांगली असेल असे इंडिया रेटिंग्ज या संस्थेने म्हटले आहे. तेलंगणामध्ये रायथू बंधू योजना आहे, या धर्तीवर केंद्र सरकार हंगामी बजेट सादर करताना योजना आणेल असा अंदाज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृषी क्षेत्राच्या समस्या भारताला नवीन नसून त्यांचा मुकाबला करण्यासाठी विविध सरकारांनी व राज्यांनी अनेक योजना आणल्या. तसेच ग्रामीण भागामध्ये नागरिकांच्या हातात पैसा असावा म्हणून किमान हमीभावासारख्या योजनांनाही चालना देण्यात आली. या सगळ्याबरोबरच किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना लागू केली तर ग्रामीण भारताला त्याचा विशेष फायदा होईल, असा अंदाज आहे.

येत्या लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर केंद्र व राज्यांची बजेट ही शेतकऱ्यांचा विचार करून सादर होतील असा अंदाज या आहे. जर प्रति एकर प्रति वर्ष 8,000 रुपयांच्या किमान उत्पन्नाची हमी गरीब शेतकऱ्यांना दिली गेली तर लहान शेतकऱ्यांना किमान 7,515 रुपये ते कमाल 27,942 रुपये प्रति वर्ष मिळतील असा अंदाज आहे. यावर सध्या आकडेमाड सुरू आहे.


दारिद्य्र रेषेखालील व्यक्‍तींना म्हणजे साधारणपणे 20 टक्‍के लोकसंख्येला प्रतिवर्षाला आठ हजार रुपयांप्रमाणे रक्‍कम दिल्यास त्याला साधारणपणे राष्ट्रीय उत्पन्नाच्या दीड टक्‍के रक्‍कम लागेल. यामुळे परिणामकारकरित्या दारिद्य्र निर्मूलन वेगात होण्याची शक्‍यता असल्यामुळे अशा योजनेवर आम्ही गंभीर विचार करीत आहोत.
पी. चिदंबरम, माजी केंद्रीय अर्थमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)