आखाडामुळे बेल्हे बाजारात बकरांची मोठी आवक

नेहमीपेक्षा मिळाले चांगले पैसे ः शेतकरी समाधानी

अणे-जुन्नर तालुक्‍यातील बेल्हे येथील सोमवारचा आठवडे बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. आषाढ महिन्यातला शेवटचा सोमवारचा (दि.29) बाजार असल्याने बकरांची संख्या मोठ्या प्रमाणात बाजारात होती. यावेळी शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या शेळ्या-मेंढ्यांना नेहमीच्या तुलनेत चांगले पैसे मिळाले. त्शयामुळै शेतकरी खुशीत असल्याचे पाहायला मिळत्तले.

या बाजारात दिवसभरात 713 शेळ्या, मेंढ्या व बकरांची आवक झाली होती. नेहमीपेक्षा जवळजवळ 300पेक्षा जास्त बकऱ्यांची आवक या बाजारात आखाड असल्यामुळे झाली.अनेक शेतकऱ्यांनी आपले बकरे या बाजारात विकण्यासाठी राखून ठेवले होते. नेहमीपेक्षा चांगलाच बाजार भाव या बाजारात आपल्या बकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळाला. पाऊस असून सुद्धा बाजारांमध्ये बकऱ्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. पावसाचा कोणताही परिणाम व्यापारी व शेतकरी वर्गावर झाला नाही. या बाजारात अनेक जिल्ह्यांतून व्यापारी बकऱ्यांची खरेदी करण्यासाठी आले होते. नेहमीपेक्षा जास्त बाजारभाव मिळणार असल्याने शेतकरी जास्तीत जास्त बोकड विक्रीसाठी घेऊन येतात. सकाळपासून बाजार तेजीत होता. 2 हजार ते 4 हजार रुपयांनी वाढीव भाव शेतकऱ्यांना या बाजारात मिळाला.

  • चॉंदवाला बोकडालाही मागणी
    पुढील महिन्यात बकरी ईद असल्याने काही शेतकऱ्यांनी चॉंदवाला बोकडही बाजारात आणले होते. मात्र सर्वसाधारण बोकडांच्या तुलनेत या बोकडाचा दर खूपच जास्त होता. तरीही चॉंदवाला बोकडाला मुस्लीम समाजात विशेष महत्त्व असल्याने व्यापारी अशा बकरांची खरेदी करून ठेवत चांगले गिऱ्हाईक शोधून चांगले पैसे कमावतात.
  • आखाडा असल्यामुळे शेतकरी आपल्या शेळ्या, मेंढ्या व बोकडाला जास्त भाव सांगतात. या बाजारात दोन ते चार हजाराच्या तेजीने आम्हाला खरेदी करावी लागली.
    -हनुमान नेहरकर, बकरांची व्यापारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.