आकुर्डीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आकुर्डी - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सरस्वती विद्यालय व नगरसेवक प्रमोद कुटे युवा मंच यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

आकुर्डी – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकुर्डी येथील सरस्वती माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व नगरसेवक प्रमोद कुटे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ व शिक्षण तज्ज्ञ विवेक वेलणकर यांचे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभाग अध्यक्ष अनुराधा गोरखे, नगरसेविका शर्मिला बाबर, शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर, शिवसेना शहर संघटक जितेंद्र ननावरे, माजी नगरसेविका ऍड. उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक राजु दुर्गे, सुजाता टेकवडे, युवा नेते झिशानभाई सय्यद, सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुटे, धोंडिबा नामदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक प्रमोद कुटे व शिवसेना विभाग प्रमुख फारुख शेख यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)